जत महसूलमधिल अधिकारी,तलाठ्याचे खांदेपालट कधी

जत,संकेत टाइम्स : जत‌ पोलीस ठाण्याचे बिट हवलदार बदलण्यात आले आहेत, मात्र गेल्या अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी तळ ठोकलेले महसूल विभागातील मंडल अधिकारी व तलाठी यांची खांदेपालट कधी असा सवाल उपस्थित होत आहे.जत पोलीस ठाण्याचा पदभार घेतलेले पो.नि.आप्पासाहेब कोळी यांनी अनेक दिवसापासून तळ ठोकलेले बीट हवलदारांची तालुक्या अतर्गंत खांदेपालट केली आहे. त्याचबरोबर काही कनिष्ठ अधिकारी व कर्मचारीही बदलले आहेत.तसाच प्रकारे महसूल विभागातील मंडल अधिकारी, तलाठी यांची खादेपालट करण्याची मागणी होत आहे.गेली आठ-दहा वर्षे तळ ठोकलेले अधिकारी,तलाठी यांचे‌ स्थानिक नेते, वाळू तस्कर,दलालांशी जवळचे नाते तयार झाले आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांना थेट कामे करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे, अनेकवेळा संबधित अधिकारी,तलाठ्याकडून दलालाकडे जाण्याचा सल्ला दिला जात आहे.यामुळे शेतकऱ्यांची लुट केली जात आहे.अनेक दिवस एकाच सज्जावर तळ ठोकलेले तलाठी,मंडल अधिकारी तहसीलदार होऊन बसले आहेत. अपवाद वगळता अनेक तलाठी सज्जावर न जाता शहरातून कारभार हाकत असून महत्वाची कागदपत्रे खाजगी उमदेवारांच्या हातात दिली जात असल्याचा गंभीर प्रकार जत तालुक्यात अनेक दिवसापासून सुरू आहे. 


त्यामुळे अनेक सातबारावरील नावे कमी करणे,नविन घुसडणे,मयत व्यक्ती असताना जीवंत दाखवून वारस लावणे,तालुक्यातील ‌अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्रकार सर्रास सुरू आहे. याला तळ ठोकलेले मंडल अधिकारी, तलाठी जबाबदार आहे.परिणामी महसूलमध्ये दलाल अधिकारी झाले आहेत. मोफत होणाऱ्या कामांना 20-30 हजारापर्यत लुट केली जात आहे.हा प्रकार रोकायचा असलेतर प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांनी जातीने लक्ष घालून पोलीसाप्रमाणे अनेक वर्षापासून एकाच जागेवर तळ ठोकलेले मंडल अधिकारी, तलाठी यांचे खादेपालट करावीत अशी मागणी होत आहे.