लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचा प्रभाव दिवसेन् दिवस वाढत असतानाही नागरिकांचा हालगर्जीपणा धोका वाढवत आहे.
कोरोनाचे रुग्ण दररोज‌ 50 च्या आसपास आढळून येत आहेत.
जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. जत तालुक्यात मात्र हा आदेश पायदळी तुडवला जात आहे.दुकाने उघडणे, आठवडा बाजार भरविण्यात येत आहेत. यात सोशल डिस्टसिंग, मास्क वापर केला जात नाही.त्याशिवाय जंगी लग्नसोहळे आयोजित करण्यात येत आहेत.या‌ सर्वावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा गेल्या दोन वर्षापासून काम करत असल्याने काहीशी ढिली पडली आहे. त्यामुळे काही अंशी नियंत्रण ढिले झाल्याने कोरोनाची तिसरी लाट संभवत आहे.त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे.
लसीकरण वेग वाढवावा

जत तालुक्यात कोरोना लसीकरणास अल्प प्रतिसाद मिळत असल्याने आतापर्यत फक्त 20 टक्केच लसीकरण झाले आहे.कोरोनाला रोकायचे असेलतर लसीकरणाचा वेग वाचविण्याची गरज आहेच,त्याशिवाय ग्रामीण भागात असणारा गैरसमज दूर करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायती, समाजसेवी संस्था,मंडळानी जनजागृत्ती करून नागरिकांना लसीचे महत्व पटवून देण्याची गरज आहे.