खिलारवाडी खूनप्रकरणी सहा जूलैपर्यत पोलीस कोठडी

जत,संकेत टाइम्स : खिलारवाडी (ता. जत) येथे मुलीला पळवून नेल्याचा राग मनात धरून नाना शिवाजी लोखंडे (वय 27) या तरुणाचा कर्नाटकात अपहरण करून दगडाने ठेचून खून केला होता.

याप्रकरणी अर्जुन महादेव शिंदे (वय 40,रा. अभिनंदन कॉलनी, सांगली),जगन्नाथ बाळासो लोखंडे(वय 23,रा.खिलारवाडी),विनायक बाळासाहेब शिंगाडे(वय 21,रा.सुभाषनगर,ता.मिरज)या तिघांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने सहा जूलै पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.घटनेतील एक आरोपी अद्याप फरारी आहे.पोलीसाकडून त्याचा तपास सुरू आहे.