चंदन तस्करीच्या तयारीतील चौघा संशयितांना पकडले | पुन्हा तस्करांनी डोके वर काढले

जत,संकेत टाइम्स : सोन्याळ ता.जत येथे चंदन तस्करी करण्याच्या तयारीत असलेले कोळीगिरी येथील चौघांना उमदी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
सचिन पल्हाद कांबळे,लक्ष्मण नारायण भोसले,राजू गजानन पवार,सदाशिव सुखदेव डिसकळ सर्व रा.कोळेगिरी असे अटक केलेल्या संशयिताची नावे आहेत.घटना गुरूवारी आठच्या सुमारास घडली.याप्रकरणी उमदी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.अधिक माहिती अशी,सोन्याळ येथील निवर्गी वस्तीकडे जाणाऱ्या ओढा पात्रा लगतच्या शेतात संशयित चौघे चंदनाची झाडे तोडण्याच्या तयारीत असताना पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडे दोन दुचाकी,लहान दांड्याची कुराड जप्त करण्यात आली आहे.जत तालुक्यात होणारी चंदन तस्करी चर्चेत आहे.जत व उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मध्यरात्री बेधडक चंदन तस्करी सुरू आहे.संशयित दिवसभर अशा झाडाचा टेहाळणी करून रात्रीच्या सुमारास ती झाडे चोरीच्या मार्गाने तोडण्यात येत आहेत.याकडे पोलीसाचा कानडोळा होत असल्याने तस्करी राजरोसपणे वाढली आहे.काही बिट हवलदारांना या तस्करांकडून लक्ष्मीदर्शन घडविण्यात येत असल्याचीही चर्चा आहे.