अरविंद धरणगुत्तीकर यांना शिक्षक संघाकडून निरोप

जत,संकेत टाइम्स : जतचे गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर हे 30 जून रोजी 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.सेवानिवृत्ती निमित्य त्यांचा जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या (शि.द.) वतीने सत्कार करण्यात आला. संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी संघांचे सरचिटणीस गुंडा मुंजे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, तालुका उपाध्यक्ष भगवानराव वाघमोडे,तालुका संघटक विष्णू ठाकरे,सुदाम कराळे यांच्यासह संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.सत्कार प्रंसगी संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी धरणगुत्तीकर यांनी केलेल्या प्रशासकीय कामाचा उहापोह केला. सांगली जिल्ह्यात जत व कवठेमहांकाळ येथे काम करत असताना सर्वसामान्यांच्या कामांना प्राधान्य दिले. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यावरही त्यांनी भर दिल्याचे सांगितले.


गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांचा सत्कार करण्यात आला.