कार्यकुशल आणि लोकाभिमुख नेतृत्व हरपले

माजी आमदार उमाजी धानाप्पा सनमडीकर यांचा जन्म 22 जून 1939 रोजी सनमडी ता. जत, जि.सांगली या गावी अगदी गरीब कुंटुबात झाला होता.कष्टाळू असलेले सनमडीकर यांनी भारतीय सैन्यदलात 15 वर्षे नोकरी केली होती.त्यांनतर गावातील ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य ते‌ आमदार असा राजकीय प्रवास सनमडीकर यांनी आपल्या कतृत्वावर केला होता.तालुक्यातील एक सामान्य कुंटुबातून आलेल्या माजी सैनिकाने तब्बल तीन टर्म जतचे आमदार पद भूषविले होते.त्यांनी तालुक्यातील गोरगरिब नागरिकांची मुले शिकली पाहिजेत म्हणून सिध्दार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी हे शैक्षणिक संस्था स्थापन केली.

त्या माध्यमातून राजर्षि छ. शाहू महाराज प्राथ.आश्रमशाळा, जत,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथ.आश्रमशाळा,माडग्याळ.महात्मा जोतिराव फुले प्राथ.आश्रमशाळा, सनमडी,संत गाडगेबाबा माध्य व उच्च माध्य. आश्रमशाळा, जत.,महात्मा फुले मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, जत ,सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, जत , श्री.उमाजीराव सनमडीकर अध्यापक विद्यालय, जत, श्री. उमाजीराव सनमडीकर मेडिकल फौंडेशन, जत, सिध्दार्थ पॉलिटेक्नीक, जत, सिध्दार्थ पब्लिक स्कूल, जत, सिध्दार्थ जलतरण केंद्र, जत, कमल इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, जत,सिध्दार्थ बालकामगार केंद्र, जत, माजी सैनिकांसाठी जत येथे मिलिटरी कँटीन अशा संस्था‌ उभा करून गोरगरिब नागरिकांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय तर केलीच मात्र त्याचबरोबर चार बेरोजगार तरूणांच्या हाताला काम मिळवून दिले आहे.


सनमडी हायस्कूल, सनमडी हायस्कूल स्थापन करण्यात त्यांनी मोठा वाटा उचलला होता.आमदार सनमडीकर जत तालुक्याला वरदान ठरलेल्या म्हैशाळ 6 व्या टप्याचे जनक आहेत.त्यांच्या काळात तालुक्यात म्हैसाळ योजना आकाराला आली होती.
गोरगरीब जनतेला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करण्यात‌ ते अग्रेसर होते.राष्ट्रपुरुषांची जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम साजरे करणेमध्ये पुढाकार, विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन, समाज
प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन, रक्तदान शिबीर त्यांनी घेतली आहेत.नेत्रचिकित्सा, आरोग्य शिबीरे, कुटूंब नियोजन कार्यक्रम
इत्यादी कार्यामध्ये सहभाग असायचा,दुष्काळग्रस्त जत तालुक्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजना कार्यान्वित करणेसाठी प्रयत्न केले तसेच विविध पाटबंधारे प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यात जलसिंचन सुविधा वाढविणेसाठी प्रयत्न केले होते.

भूषविलेली पदे
जत विधानसभा सदस्य -
1. 1985 ते 1990 राष्ट्रीय काँग्रेस
2. 1990 ते 1995 अपक्ष
3. 1999 ते 2004 राष्ट्रीय काँगेस
4. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबई-अध्यक्ष

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 
1. सनमडी ग्रामपंचायत उपसरपंच
2. जत पंचायत समिती जत,सदस्य 1978-1984
3. सांगली जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. सांगली : संचालक
4. विजयसिंहराजे डफळे सह. साखर कारखाना : संचालक