पेट्रोल,डिजेल दरवाढ कमी करा,कामगार सेनेचे निवेदन

जत,संकेत टाइम्स : केंद्र सरकारने केलेली अन्याय कारक आहे.कोरोना संसर्गामुळे नागरिक अडचणीत असताना पेट्रोल, डिझेलची दरवाढ करून मोदी सरकारने सामान्य लोकांचे जगणे हैराण के ले आहे,त्यामुळे तात्काळ ही दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली.तसे निवेदन कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पंतगरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,केंद्र सरकार कमीत कमी 10 रुपये पेट्रोल-डिझेलवर कमी करुन जनतेला दिलासा देऊ शकतं. पण सरकार हे करण्यास तयार नाही. सरकार प्रत्येकी एक लिटर पेट्रोल, डिझेलने 32-35 रुपये सरचार्ज, सेस, एक्साईज ड्युटी घेते. यातून सरकार 10 रुपये कमी करुन त्याचा लाभ जनतेला देऊ शकते, किमान या कोरोना काळात तरी पण ते सरकार करायला तयार नाही.यापुढे केंद्र सरकारने विचार करून दरवाढ कमी करावी,अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला आहे.


यावेळी तालुकाप्रमुख सुरेश घोडके,विभाग प्रमुख चैतन्य कोरे,युवा सेना सिरचिटणीस रोहित पाचंगे,अर्जुनभोसले, भीमराव आडसूडे, राजू पवार,राजू सावंत उपस्थित होते.

पेट्रोल, डिजेल दरवाढ मागे घ्यावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले.