सांगली जिल्ह्यात 852 नवे रुग्ण

सांगली : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 852 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे सांगली महापालिका क्षेत्र 208 नवे रुग्ण आढळून आल्याने धोका वाढला आहे.जिल्ह्यातील 22 कोरोना रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.943 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.


जिल्ह्यात सध्या 9,880 अँक्टिव्ह रुग्ण आहेत.1 लाख 49 हजार 763 एकूण रुग्णाची नोंद झाली आहे. तर आज अखेर 1 लाख 35 हजार 854 रुग्ण बरे झाले आहेत.जिल्ह्यात म्युकर मायकोसिस रविवारी एकाही रुग्णाचा मुत्यू झालेला नाही.एकूण रुग्ण 295,एकूण 21 रुग्णाचे मुत्यू झाले आहेत.