बिळूरमध्ये पुन्हा नवे 7 रुग्ण,तालुक्यात 33

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात सोमवारी 33 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दुर्देवाने पुन्हा दोघाचा मुत्यू झाला आहे.तर 22 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.सध्या तालुक्यात 450 जणावर उपचार सुरू आहेत. त्यापैंकी 393 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत. एकीकडे तालुक्यात कोरोना मुक्त होणारी टक्केवारी 93 टक्के आहे,मात्र सातत्याने होणारे रुग्णाचे मुत्यू अजूनही कोरोनाचा प्रभाव कायम असल्याचे चित्र आहे.दररोज 30 ते 35 च्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत.


सोमवारी बिळूर 7, जिरग्याळ ‌5,जत 5 येथे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.
तालुक्यात कोरोना बाधित आकडा 11,136 वर पोहचला आहे. तर 263 जणांचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे.
तालुक्यात कोरोना संपला आहे,असे म्हणणे घाईचे ठरणारे आहे.नागरिकांचा मास्क,सोशल डिस्टसिंग विना वाढलेला वावर तिसरी लाट अटळ असल्याचे स्पष्ट होत आहे.


जत 5,अमृत्तवाडी 1,काराजनगी 1,लकडेवाडी 1,सोर्डी 1,मिरवाड 2,जिरग्याळ 5,खलाटी 1,डफळापूर 2,बिळूर 7,खोजानवाडी 1,वाळेखिंडी 1,वायफळ 1,शेगाव 1,कोसारी 1,दरिकोणूर 1,गिरगाव 1 असे 33 रुग्ण आढळून आले आहेत.