गुळवंची हायरिस्कवर,तालुक्यात 66 रुग्णाची नोंद

0



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोना नवे रुग्ण वाढीचा आकडा स्थिर असून शनिवार ता.24 ला नव्या 66 रुग्णाची नोंद झाली आहे. तालुक्यातील 25 गावात हे रुग्ण आढळून आले आहेत.तर 50 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.






तालुक्यात सध्या 810 रुग्ण उपचाराखाली आहेत.

गुळवंची,शेगाव,शिंगनहळ्ळी, वाळेखिंडी येथे पाचपेक्षा जादा रुग्ण आढळून आल्याने चिंता कायम आहे.

जत शहरासह तालुक्यातील प्रमुख गावात बंद पाळण्यात येत असल्याने रुग्ण संख्या स्थिर आहे.मात्र विवाह सोहळे जंगी होत असल्याने कोरोना संसर्ग कायम आहे.दोन गावात लग्न सोहळ्यामुळे अचानक‌ मोठ्या नवे रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील आकडा वाढला आहे.त्यामुळे प्रशासनाच्या नियमाचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे.





जत 4,तिप्पेहळ्ळी 1,पाच्छापूर 1,देवनाळ 1,बिरनाळ 1,अचनहळ्ळी 3,वाळेखिंडी 5,गुळवंची 15,शेगाव 6,हिवरे 1,शिंगनहळ्ळी 5,आंवढी 3,कोसारी 2,राजोबाचीवाडी 1,माडग्याळ ‌4,सोन्याळ 1,कागनरी 1,करेवाडी को.2,गुलगुंजनाळ 1,बिळूर 1,साळमळगेवाडी 1,उमदी 1,डफळापूर 2,बेंळूखी 1,दरिकोणूर 2 असे 66 रुग्ण आढळून आले आहेत.

Rate Card




सांगली जिल्ह्यात 858 नव्या रुग्णांची नोंद,20 जणाचा मृत्यू



सांगली : जिल्ह्यात शनिवार ता.24 रोजी दिवसभरात 858 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.महापालिका क्षेत्र 135 नवे रुग्ण आढळून आले आहेत.जिल्ह्यातील 20 कोरोना रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.तर 981 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 9,341 रुग्ण सध्या उपचाराखाली आहेत.जिल्ह्यात 1 लाख 69 हजार 784 एकूण रुग्णाची नोंद झाली आहे तर 1 लाख 55 हजार 945 कोरोना मुक्त झाले आहेत.म्युकर मायकोसिसचे शनीवारी दोन रुग्ण आढळून आल्याने एकूण संख्या 328 पोहचली आहे.शनिवार अखेरपर्यत 35 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.