जतेत मंगळवारी 62 रुग्णांची नोंद,4 जणांचा मुत्यू

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात पुन्हा कोरोनाने पाय पसरले असून 30 च्या पट्टीत असलेले रुग्ण आता दुप्पट म्हणजे 60 च्या वर दररोज आढळून येत आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.परिणामी प्रांताधिकारी प्रंशात आवटे, तहसीलदार सचिन पाटील हे स्व:ता हॉटस्पॉट गावात बैठका घेत खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहेत.


पुर्णत: दुकाने बंद ठेवावेत,कंटेनमेंट झोन करणे,संशयिताच्या तपासण्या,लसीकरण बाबतच्या ग्रामपंचायतीना  सुचना देण्यात येत आहेत.
दरम्यान मंगळवारी तालुक्यात 62 नवे रुग्ण आढळून आले आहेत.तर दुर्देवाने 4 रुग्णाचा मुत्यू झाला आहे.
जत 9,अमृत्तवाडी 1,तिल्याळ 1,खंडनाळ 1,सिध्दनाथ 1,लमाणतांडा 4,गोधळेवाडी 1,संख 1,आंसगी जत 1,शिंगनहळ्ळी 3,वाळेखिंडी 4,हिवरे 2,बेवनूर 1,बनाळी 2,शेगाव 1,डफळापूर 7,बाज 2,बेंळूखी 2,जिरग्याळ 1,शिंगणापूर 5,एकूंडी 2,मिरवाड 1,कंठी 1,खलाटी 2,माडग्याळ 1,उमदी 3,करेवाडी को 1,उमराणी  1 असे एकूण 62 रुग्ण आढळून आले आहेत.यामुळे तालुक्यात 11,879 रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैंकी 10,892 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या 709 रुग्ण उपचाराखाली आहेत. तर दुर्देवाने 278 रुग्णाचा आतापर्यत मुत्यू झाला आहे.
दरम्यान नागरिकांची बेपर्वाही कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.