जत तालुक्यात शुक्रवारी 61 नव्या रुग्णांची नोंद

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात शुक्रवारी 61 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.तर 32 रुग्ण कोरानामुक्त झाले आहेत.सध्या 594 रुग्ण उपचाराखाली आहेत.त्यापैंकी 519 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.
तालुक्यातील कोरोनाचा आलेख वाढत असल्याने धोका बळावत आहे.
त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. पोलीस,आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.जत 11,निगडी खु 2,देवनाळ 1,अमृत्तवाडी 1,उटगी 1,उमदी 1,करेवाडी को 1,बिळूर 3,रावळगुडेवाडी 1,डफळापूर 6,खलाटी 1,व्हसपेठ 6,माडग्याळ 1 असे 61 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
यामुळे तालुक्यातील संख्या 11,623 वर पोहचली असून 10,760 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.आतापर्यत 269 रुग्णाचा दुर्देवी मुत्यू झाला आहे.