तीन वेगवेगळ्या घटनेत 6 जण जखमी | बाज,मेंढिगिरी,निगडी बु.येथे किरकोळ कारणावरून मारामारी

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील बाज,मेंढीगिरी,निगडी बुद्रुक येथील तीन वेगवेगळ्या हाणामारीच्या घटनेत सहा जण जखमी झाले आहेत, तर पाच जणावर जत,उमदी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
बाज येथे विहिरीच्या पाण्याच्या पाळीवरून आप्पासो विठोबा शिंदे त्यांच्या पत्नी अनिता,आई समाबाई यांना आबासो विठोबा शिंदे (रा.बाज) यांने दारू पिऊन येत वडिल विठोबा यांना पाळी पाहिजे म्हणून काठी,लाथाबुक्यानी मारहाण करून जखमी केल्याची घटना गुरूवारी घडली आहे. 


याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान मेंढिगिरी ता.जत येथे दत्ता परसाप्पा कांबळे व त्यांची आई सुदबा यांना सोरडी येथे मुलगी पाहण्यासाठी गेले असता तुम्हीच काहीतरी सांगितले म्हणून पावन्यानी नकार दिला,यांचा संशय घेत महादेव यमनाप्पा केंगार,अनिल सुभाष ऐवळे,संगव्वा यमनाप्पा केंगार (रा.मेंढिगिरी) यांनी शिवीगाळ करून काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना गुरूवारी सांयकाळी 3 वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान संजय धर्मण्णा चौके (रा.निगडी बुद्रुक) हे राजेंद्र कांरडे व लक्ष्मण गुंडा कांरडे यांच्यातील घर जागेचा वाद मिटवत असताना राजेंद्र रामा कांरडे रा.निगडी बु.यांने शेजारी पडलेला दगड उचलून संजय चौक यांच्या छातीवर मारला,त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्याशिवाय फिर्यादीला संशयित रांजेद्र कांरडे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी उमदी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.