नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराचे प्रोत्साहन अनुदान तात्काळ द्या ; बसवराज बिराजदार | नियमित कर्ज भरून आमची चूक झाली का?

0



उटगी,संकेत टाइम्स ; राज्यातील महा विकास आघाडी शासनाने नियमित

कर्जाची परतफेड करणाऱ्या

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली, परंतु अनेक महिने उलटूनही नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनाची दमडीही मिळालेली नाही,शासनाने कोरोनामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपयाची तात्काळ मदत‌ करावी,अशी मागणी माजी पंचायत समिती सभापती बसवराज बिराजदार यांनी केली आहे. तसे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.






कर्जमाफी वेळी पोकळ आश्वासनाने

प्रोत्साहनच्या मदतीची आशा धुसर झाली आहे.त्यामुळे शासनाची ही घोषणा फसवी असल्याचा आरोप बिराजदार यांनी केला आहे,शासनाला घोषणेचा विसर पडल्यामुळे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी प्रोत्साहन पासून वंचित आहेत.जत तालुक्यातील हजारो शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी आहेत ,हे शेतकरी विविध बँकाचे सभासद आहेत.राज्यातील महाविकास

आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दोन लाख रुपये पर्यंतची कर्जमाफी करताना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतक-यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50 हजार रुपयेची मदत देण्याची घोषणा केली होती.

Rate Card





मात्र आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्यात आली नसल्याचे म्हणने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याचे म्हणणे आहे,त्यामुळे शासनाच्या या घोषणेबाबत शंका उपस्थित केली जात आहे.कर्जदारांनी आपली पत कायम राहावी या करिता नियमित कर्ज फेड केली ,अनेकांनी दागिने विकून, सोने गहाण ठेवून उसनवारीने पैसे घेऊन, कर्ज

नियमित केले ,मात्र राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीत नियमित कर्जदारांना बाजूला ठेवण्यात आले आहे.




त्यामुळे नियमित कर्ज भरून आमची चूक झाली का ? असा संतप्त सवाल बिराजदार सह तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.भविष्यात नियमित कर्ज भरणारे शेतकरी कर्जाचे हप्ते नाहीत,असा इशाराही बिराजदार यांनी दिला आहे.




Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.