जतेत बंद घर फोडून 50 हजार लंपास

जत,संकेत टाइम्स : जत शहरातील वळसंग रोडवरील सोमनिंग चौधरी यांचे  बंद घर चोरट्यांनी फोडून 50 हजार रूपयाची रोखड लंपास केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, बाजार समितीचे सचिव असलेले चौधरी यांचे वळसंग रोड जवळ घर आहे.


रविवारी चौधरी कुंटुबिय कामानिमित्त आपले मुळ गाव असलेल्या सुसलाद गावी गेले होते.रविवारी रात्री त्यांनी सुसलाद येथेच मुक्काम केला होता.त्याचा फायदा घेत मध्यरात्री जतमधिल त्यांच्या बंद घराच्या दरवाज्याचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून घरामध्ये प्रवेश करत धार्मिक कामासाठी देवघरात ठेवलेेले रोख 50 ह‌जार रुपये लंपास केले आहेत.

सोमवारी सकाळी चौधरी घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जत पोलीसात रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल झालेला नव्हता.