जत तालुक्यात 5 रुग्णाचा मुत्यू | कोरोनामुक्त आकडा वाढला ; नवे रुग्ण स्थिर
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात बुधवारी कोरोनाच्या 45 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. तर तब्बल 5 रुग्णाचा दुर्देवी मुत्यू झाला आहे.मृत्यू आकडा 286 वर पोहचला आहे.दुसरीकडे बुधवारी केरोना मुक्त होणारे रुग्ण वाढले असून एकाच दिवशी 61रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या तालुक्यात 829 रुग्ण उपचाराखाली आहेत.
जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर कमी झाला आहे.तसेच कोरोना रुग्णाची संख्या घटल्यामुळे प्रशासनाने अनेक निर्बंध शिथिल केले होते. परंतु, निर्बंध शिथिल झाल्यानंतर मास्क न लावणे, अंतर न राखणे व सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे असे प्रकार घडल्यामुळे रुग्ण वाढ कायम राहिली आहे.
पोलीसदेखील लोकांच्या आतताईपणाला कंटाळले असून तेही या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष करत असतात.
त्यामुळे येत्या काही दिवसांत वरील परिसरात रुग्ण संख्या वेगाने वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रुग्ण संख्येत वाढ होत असताना कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्ण संख्येचाही वेग मंदावला आहे, तर मृत्यूदरही स्थिर आहे, तोही कमी झालेला नाही. उलट आज त्यामध्ये भर पडली आहे,तब्बल 5 नव्या रुग्णांचा मुत्यू झाला आहे. रस्त्यावर नाहक गर्दी करणाऱ्यांवर प्रशासन व पोलीस यंत्रणेने वेळीच उपाययोजना न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
जत 2,बिरनाळ 1,देवनाळ 3,हळ्ळी 1,उमदी 1,बोर्गी बु 1,माडग्याळ 4,कोळिगिरी 5,टोणेवाडी 1,सनमडी 1,बेंळूखी 2,मिरवाड 4,खलाटी 2,डफळापूर 2,शेगाव 5,वाळेखिंडी 1,बनाळी 1,गुळवंची 1,आंवढी 4,हिवरे 1,आसंगी तुर्क 2 असे 45 नवे रुग्ण आढळून आले आहेत.