जतेत मंगळवारी नवे 34 रुग्ण,एकाचा मुत्यू

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात मंगळवारी 34 नव्या रुग्णांची नोंद झाली.तर एका रुग्णाचा दुर्देवी मुत्यू झाला आहे.23 जण कोरोना मुक्त झाले असून 460 जण उपचाराखाली आहेत.
तालुक्यातील नव्या रुग्णाचा आकडा गेल्या आठवड्यापासून तीसच्या दरम्यान कायम आहे.रुग्णाची संख्या एकअंकी येण्याशिवाय कोरोनाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता नाही.त्यामुळे रुग्ण संख्या कमी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कारवाई करण्याची गरज आहे.

जत 9,निगडी खु 1,अमृत्तवाडी 2,अचनहळ्ळी 1,मेढेंगिरी 1,उंटवाडी 1,साळमळगेवाडी 1,वाळेखिंडी 8,शिंगणापूर 1, बेंळूखी 1,खलाटी 2,डफळापूर 4,आंसगी जत‌ 2 असे 34 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण बाधित संख्या 11,170 वर पोहचली आहे.274 जणांना कोरोना मुळे जीव गमवावा लागला आहे.