जत तालुक्यात गुरूवारी नवे 33 रुग्ण,बेंळूखीत 5

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात गुरूवारी नव्या 33 रुग्णाची नोंद झाली आहे.तालुक्यात 46 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत,तर 429 जण उपचाराखाली आहेत. तालुक्यात एकीकडे रुग्ण संख्या कमी येत आहे,मात्र कोरोनाचा प्रभाव अद्याप कायम आहे.सातत्याने नवे रुग्ण आढळून येत असल्याने चिंता कायम आहे.तालुक्यात बेपर्वार्ह नागरिक पुन्हा तिसरी लाट ओडावू पाहत आहेत.
तालुक्यात यंत्रणा काही अंशी ढिल्या पडल्याने धोका बळावू लागला आहे.जत 3,वळसंग 2,मेंढेगिरी 2,खिलारवाडी 4,वायफळ 2,हिवरे 3,गुळवंची 1,दरिकोणूर 2,पांढरेवाडी 1,मुंचडी 1,माडग्याळ 2,जाड्डरबोबलाद 1,डफळापूर 1,जिरग्याळ 1,मिरवाड 1,बेंळूखी 5,उमदी 1 असे 33 नवे रुग्ण आढळून आले आहेत.