जत तालुक्यात पुन्हा तिघांचा मुत्यू , 31 नवे रुग्ण

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात बुधवारी पुन्हा तीन रुग्णाचा कोरोनामुळे मुत्यू झाला.तर नव्या 31 रुग्णांची नोंद झाली आहे.
त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 11 हजाराच्या आसपास पोहचली आहे.
गेल्या आठ दिवसात नवे रुग्ण आढळून येत होते मात्र एकाही रुग्णाचा मुत्यू झाला नव्हता,मात्र बुधवारी पुन्हा दुर्देवाने 3 रुग्णाची मुत्यू झाला. यामुळे एकूण मुत्यू संख्या 259 झाली आहे.
सध्या‌ तालुक्यात 442 जण उपचाराखाली आहेत.बुधवारी तब्बल 60 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
सातत्याने आढळणारे रुग्ण व मुत्यू यामुळे धोका कायम असल्याचे चित्र आहे.
जत 8,अचनहळ्ळी 1,बिळूर 1,माडग्याळ ‌1,उमदी 2,घोलेश्वर 1,मुंचडी 2,वाळेखिंडी 6,बाज 1,डफळापूर ‌2,मिरवाड 2,शिंगणापूर 4 असे 31 रूग्ण आढळून आले आहेत.