जत तालुक्यात रविवारी 27 रुग्णाची नोंद

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात रविवारी 27 नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे.तर 36 रुग्णा कोरोनावर यशस्वी मात केली आहे.रविवार असल्यामुळे तपासण्या काही प्रमाणात कमी झाल्याने रविवारीची रुग्णसंख्या कमी दिसून येत आहे.तालुक्यात सध्या‌ 441 रुग्ण उपचाराखाली आहेत.त्यापैंकी 381 जण होम आयसोलेशन मध्ये आहेत.
तालुक्यात कोरोना अद्याप नियंत्रणात आहे मात्र नागरिकांची अशीच बेपर्वार्हपणा राहिल्यास परिस्थिती कधीही धोकादायक होऊ शकते.
तालुक्यात आतापर्यत 11,103 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 10,401 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. दुर्देवाने 261 रुग्णाचा मुत्यू झाला आहे.