जत तालुक्यात 23 गावात नवे 39 रुग्ण

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात गुरूवारी 23 गावात नवे 39 रुग्ण आढळून आले आहेत.
तर 38 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यातील रुग्ण संख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्या 447 रुग्ण उपचाराखाली आहेत.त्यामुळे तालुक्यात  कोरोनाचा प्रभाव अद्याप कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र कायम आहे.

तालुक्यात एकूण रुग्ण
11,240 वर पोहचली आहे,10,529 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दुर्देवाने 264 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.जत 1,रामपूर 6,बिरनाळ 1,निगडी खु.4,उटगी 1,बिळूर 1,खोजानवाडी 1,भिवर्गी 1,जालीहाळ बु.2,शिंगणापूर 3,डफळापूर ‌2,बेंळूखी 1,कुडणूर 1,संख 1,आंसगी तुर्क 1,वाळेखिंडी 3,कुंभारी 1,हिवरे 3,बनाळी 1,माडग्याळ 1,टोणेवाडी 1,कोळगिरी 1,व्हसपेठ 1 असे 39 रुग्ण आढळून आले आहेत.