जत तालुक्यात फक्त‌ 20 टक्के लसीकरण

सांगली : जिल्ह्यात जत तालुक्यात लसीकरणाला अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. तेथे जनजागृती मोहिम राबवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.


जिल्ह्यात आजवर 7 लाख 38 हजार 995 जणांना पहिला डोस तर 2 लाख 12 हजार 801 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.32 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. अन्य तालुक्यांच्या तुलनेत जतमध्ये कमी झाले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी याचा आढावा घेऊन सांगितले की, जतमध्ये लोकप्रतिनिधी, आशा कार्यकर्त्या यांच्यामार्फत जनजागृती करावी. लसींचा जादा पुरवठा करावा. लसीकरण केंद्रेही वाढवावीत. खासगी लसीकरण केंद्रांची काटेकोर तपासणी करावी. तेथे आवश्यक सुविधा आवश्यक आहेत. या केंद्रांना मंजुरी देता नियमांची पुर्तता आवश्यक आहे.