2022 ला नगरपरिषदेवर एकहाती सत्ता आणू ; विलासराव जगताप | मिथून भिसे स्विकृत्त नगरसेवक

जत,संकेत टाइम्स : जत नगरपरिषदेत यापुढे युवकांना प्राधान्य असले,पुढील निवडणूकीत भाजपची एकहाती सत्ता आणू,असे उद्गार माजी आमदार विलासराव जगताप यांनी काढले.
जत नगरपरिषदेच्या स्विकृत्त नगरसेवक पदी अखेर शुक्रवारी एका सामान्य कुंटुबातील युवक नेते मिथून भिसे यांची बिनविरोध निवड झाली.जगताप यांनी 2022 च्या निवडणूकीत जत नगरपरिषदेवर एकहाती सत्ता आणण्यासाठी करेक्ट कार्यक्रम या निवडीच्या निमित्ताने केला आहे.
जत नगरपरिषदेच्या भाजपाच्या कोट्यातील स्विकृत्त नगरसेवक म्हणून मिथून भिसे यांची प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांनी निवडीची घोषणा करताच‌ भाजपाच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला.फटाक्याची आतषबाजी,गुलालाची उधळण करत भला मोठा पुष्पहार घालून माजी आमदार जगताप व नुतन नगरसेवक भिसे यांचा सत्कार केला.यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार, माजी नगरसेवक उमेश सांवत,प्रकाश माने,प्रमोद हिवरे,गटनेत्या श्रीदेवी जावीर,जयश्री मोटे,शहर अध्यक्ष आण्णा भिसे,सद्दाम आत्तार व
भाजपाचे पदाधिकारी आदी नगरसेवक उपस्थित होते.
जगताप म्हणाले, जत नगरपरिषदेत गेल्या चार वर्षात अपेक्षित‌ विकास झालेला नाही.लोकांच्या समस्या कायम आहेत.त्यामुळे अंसोष पसरला आहे.
आम्ही यापुढे नगरपरिषदेसाठी युवकांना प्राधान्य देणार आहोत.जत शहराच्या सर्वागिंन विकासासाठी भाजपाची तरूणांची टिम पुढच्या निवडणूकीत एकहाती सत्ता स्थापन करेल,असेही जगताप म्हणाले.नगरसेवक मिथून भिसे म्हणाले,माजी आमदार विलासराव जगताप यांनी माझ्या सारख्या‌ सामान्य युवकांला नगरसेवक म्हणून संधी देत मोठा विश्वास दाखविला आहे.तो मी सार्थ ठरवेन.जनतेच्या हिताच्या व विकास कामासाठी यापुढे सत्ताधाऱ्यांशी लढून प्रश्न सोडविण्याचा माझा प्रयत्न राहिल.


जत नगरपरिषदेच्या स्विकृत्त नगरसेवक पदी मिथून भिसे यांची निवड होताच जल्लोष करण्यात आला.