तिकोंडीत दारू अड्ड्यावर छापा | 2 हजाराची दारू जप्त | दारू विक्रीचे संख कनेक्शन

जत,संकेत टाइम्स : तिकोंडी ता.जत येथे बेकायदा दारू विक्री अड्ड्यावर उमदी पोलीसांनी छापा टाकत 2 हजार रूपयाच्या 25 बॉटल देशी दारू जप्त केली.अड्डा चालक महादेव सनदी हा फरार झाला आहे.
अधिक माहिती अशी, तिंकोडी येथील धानेश्वरी हॉस्पिटल समोरील पडक्यात घरात महादेव सनदी हा देशी दारू बेकायदा विकत असल्याची माहिती उमदी पोलीसांना मिळाली होती, त्या आधारे तेथे छापा टाकला असता सनदी हा देशी दारू विक्री करताना आढळून आला,मात्र पोलीस दिसताच तो पळून गेला,अड्ड्यावर देशी दारूच्या 25 बॉटल जप्त केल्या आहेत, त्यांची किंमत दोन हजार रूपये होते.याप्रकरणी उमदी पोलीस महादेव सनदी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान संख येथील परवाना धारक दारू विक्रेत्याकडून अशी गावोगाव दारू विना परवाना बॉक्सने दारू विक्री केली जात असल्याची चर्चा आहे.यामुळे गावागावात बेकायदा दारू अड्डे बहरले आहेत.कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे.संख येथील परवाना धारक दारू दुकानांची तपासणी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.