15 वर्षे देशाची,पंधरा वर्षे तालुक्याची सेवा केली

जतचे माजी आमदार उमाजीराव सनमडीकर हे जनतेशी नाळ जोडलेले आमदार होते.स्व.पंतगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली सनमडीकर काका यांनी जत तालुक्यात कॉंग्रेस पक्ष वाचविण्यासाठी काम केले.कायम कॉग्रेसचा विचाराशी बांधिल असणारा हा नेता शेवटच्या क्षणापर्यत कॉग्रेसशी एकनिष्ठ राहिला.


सामान्य कुंटुबातून आलेले सनमडीकर काकांना तालुक्यातील जनतेने डोक्यावर घेत तीन वेळा आमदार केले.त्या काळात‌ त्यांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत.जनतेची नाळ कधीही आमदारकीची हवा डोक्यात जाऊ दिली नाही.सामान्य माणसालाही आदराने बोलणार नेत्या जत तालुक्याचा भगिरथ असे काका तालुक्यात कायम प्रेरणादायी राहतील.