संखचा अपर तहसीलदार,कोळीगिरीच्या तलाठ्याला 2 लाख 30 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले | तहसीलदार फरार

जत,संकेत टाइम्स : माती वाहतूक करताना पकडलेल्या वाहनाना कारवाई न करता सोडून देण्यासाठी 2 लाख‌ 30 हजार रूपयाची लाच घेताना संखचे अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांच्या सांगण्यावरून वळंसगचे तलाठी विशाल विष्णू उदगीरे हा रंगेहाथ लाचलुचपत जाळ्यात सापडला आहे. सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.


अधिक माहिती अशी,वळसंग येथील तक्रारदार हे त्यांचे वाहनामधून मातीवाहतूक करीत असताना त्यांची वाहने अप्पर तहसील  हणमंत म्हेत्रे व तलाठी विशाल उदगीरे यांनी अडवून कारवाई कामी अपर‌ तहसीदार कार्यालय संख या ठिकाणी लावली होती. सदर वाहनांवर कारवाई न करण्याकरीता वाहने सोडण्याकरीता अपर तहसीलदार हणमंत म्हेत्रे,तलाठी विशाल उदगीरे यांनी तक्रारदार यांचेकडे 2,50,000/- रूपये लाचेची मागणी केली 


असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी दि.5 जून 2021 रोजी अँन्टी करप्शन ब्युरो सांगली कार्यालयात दिला होता.तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 9जून,11जून,16 जून तसेच आज 22 जून रोजी ब्युरोच्या कार्यप्रणाली प्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये तक्रारदार यांचे वाहनावर कारवाई न करण्याकरीता व वाहने सोडण्याकरीता यातील अपर तहसीलदार हणमंत म्हेत्रे, तलाठी विशाल उदगीरे  यांनी तक्रारदार यांचेकडे 2,50,000/- रूपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर आज दि.22 जून रोजी अपर तहसिलदार कार्यालय संख या ठिकाणी सापळा लावला असता अपर तहसीलदार हणमंत म्हेत्रे,विशाल विष्णू
उदगीरे(तलाठी माडग्याळ अति.कार्यभार कोळगीरी) यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून हणमंत म्हेत्रे, यांचे सांगणेवरून तक्रारदार यांचेकडून 2,30,000/- रूपये लाच रक्कम स्विकारले असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले 


असून अपर तहसीलदार हणमंत म्हेत्रे हे फरार आहेत.त्याअनुषंगाने हणमंत म्हेत्रे, विशाल उदगीरे यांचे विरुध्द उमदी पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस उपआयुक्त राजेश बनसोडे,अपर पोलीस उपआयुक्त सुरज गुरव,अपर पोलीस आयुक्त
सुहास नाडगौडा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक सुजय घाटगे,पोलीस निरिक्षक गुरूदत्त मोरे,प्रशांत चौगुले पोलीस अंमलदार अविनाश सागर, 


अजित पाटील, संजय संकपाळ,राधिका माने,संजय कलगुटगी, रविंद्र धुमाळ, सलीम मकानदार, प्रितम चौगुले, धनंजय खाडे, श्रीपती देशपांडे, भास्कर भोरे, सिमा माने, चालक बाळासाहेब पवार यांनी केली आहे.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, बदाम चौक,सांगली. येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२३३/२३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्स अँप नंबर ७८७५३३३३३३ व मोबाईल नंबर ८९७५६५१२६२ तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा.


संपर्क :१) मोबाईल अँप - www.acbmaharashtra.net
२) फेसबुक पेज - www.facebook.com-maharashtraACB
३) वेबसाईट - www.acbmaharashtra.gov.in