अंकलगीतील शिवनेरी पेट्रोल पंपाच्या स्पर्धेत विश्वास खिलारे प्रथम मानकरी

माडग्याळ,संकेत टाइम्स : शिवनेरी किसान सेवा केंद्र अंकलगी 
या पेट्रोल पंपाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित लकी ड्रॉ'चा निकाल जाहीर करण्यात आला. 5000 रूपये डिझेल खरेदी करणाऱ्यांमध्ये प्रथम बक्षीस(औषध फवारणी पंप) विश्वास खिलारे येळवी,द्वितीय बक्षीस(एल अँड टी स्टार्टर) चंदू तामदंडे, अंकलगी,तृतीय बक्षीस(मिक्सर ग्राइडर) शंकरप्पा हत्तळी,बेळोडगी व 1000 रूपये पेट्रोल खरेदी करणाऱ्यांमध्ये प्रथम बक्षीस(3+2 ली कुकर कॉम्बो पॅक) विश्वनाथ चौगुले अंकलगी,द्वितीय बक्षीस(टेबल फॅन) काशीनाथ सावंत, माडग्याळ,तृतीय बक्षीस(इस्त्री) दऱ्याप्पा तेली,सोन्याळ यांना मिळाले.त्याच बरोबर गेल्या वर्षभरात सर्वाधिक डिझेल खरेदी करणारे मच्छिंद्र खिलारे येळवी,प्रमोद जगदाळे येळवी,गौडाप्पा बिराजदार लोणार बाळकृष्ण शिंदे,निगडी यांचा रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांच्याहस्ते सत्कार करून भेट वस्तू देण्यात आल्या.या बक्षीस वितरणासाठी अंकलगी ग्रामपंचायतीचे सरपंच परमेश्वर बिराजदार,उपसरपंच लगमव्वा डोळी , सर्व ग्रामपंचायत सदस्य कोहळी सर,सोमु म्हेत्री ,पोलीस पाटील,म्हाळाप्पा डोळी त्याचबरोबर जि.प.सदस्य सरदार पाटील,माजी सभापती बसवराज बिराजदार,माजी प.स.सदस्य सोमण्णा हाक्के,संचालक विठ्ठल निकम,चंद्रकांत गुडोड्डगी,चेअरमन रेवप्पा पट्टणशेट्टी, चेअरमन बाळकृष्ण शिंदे,तैबू मणेर,सुभेदार सिद्ददू गायकवाड,संभाजी जाधव,श्रीकांत जाधव,चिदानंद तेली सोन्याळ,गौडाप्पा बिराजदार,लोणार सुभाष पोतदार,कुमार बिराजदार,परशुराम बंडगर,प्रमोद जगदाळे,मच्छिंद्र खिलारे व शेतकरी बंधू उपस्थित होते.अभय जमदाडे यांनी नियोजन केले.


अंकलगी ता.जत येथील शिवनेरी किसान सेवा पेट्रोल पंपावरील विजेत्या ग्राहकांना बक्षिस वितरण करण्यात आले.