संग्राम जगताप यांना स्विकृत्त नगरसेवक पदी संधी द्यावी ; बसवराज पाटील

जत,संकेत टाइम्स : जत नगरपरिषदेत माजी आमदार विलासराव जगताप यांचे नातू तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संग्राम जगताप यांना स्विकृत्त नगरसेवक म्हणून संधी द्यावी,अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांनी केली आहे.


पाटील म्हणाले,संग्राम जगताप हे भाजपा युवा मोर्चाचे नेते आहेत,गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे युवा नेतृत्व पुढे आलेले आहे.शिवाय तालुक्यातील‌ ताकतवान नेते विलासराव जगताप यांच्या छत्र छायेखाली त्यांना मोठा अनुभव मिळाला आहे. भाजपाच्या युवा आघाडीचे नेतृत्व करणारे संग्राम जगताप नगरपरिषदेच्या नगरसेवक पदासाठी पात्र आहेत.त्यामुळे भाजपाच्या‌ वरिष्ठ नेतृत्वाने त्यांना संधी द्यावी,असेही पाटील म्हणाले.