गटशिक्षणाधिकारी दिनकर खरात प्राथमिक शिक्षक संघ (शि.द.) गटाकडून स्वागत

जत,संकेत टाइम्स : गटशिक्षणाधिकारी दिनकर खरात यांचे प्राथमिक शिक्षक संघ (शि.द.) गटाकडून स्वागत करण्यात आले.
जत पंचायत समितीचे माजी गटशिक्षणाधिकारी आर.डी.शिंदे सेवानिवृत्त झाल्याने जत पंचायत समिती मध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून दिनकर खरात यांची गटशिक्षणाधिकारी म्हणून  नेमणूक झाली आहे.


त्यांचे स्वागत जत तालुका प्राथमिक शिक्षक संघ (शि. द)गटाचे तालुकाध्यक्ष भारत क्षिरसागर व त्यांचे शिष्टमंडळ यांनी जत पंचायत समिती मध्ये जाऊन स्वागत केले.
यावेळी भारत क्षिरसागर म्हणाले, जत तालुका हा विस्ताराने मोठा असून येथील प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे नोकरी करीत आहेत.त्यांना येणाऱ्या अडीअडचणी,त्यांच्या प्रशासकीय अडचणी सोडवाव्यात व संघटनेला सहकार्य करावे.


दिनकर खरात म्हणाले, लवकरच सर्व शिक्षक संघटनांची बैठक लावून शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करून सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करणार आहे. पेन्शन प्रश्न मार्गी लावणार आहोत.
यावेळी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे शि. द.जिल्हा उपाध्यक्ष जैनुद्दीन नदाफ, रावसाहेब वाघमोडे,भालचंद्र गडदे,शिक्षण विस्तार अधिकारी तानाजी गावरे,कवठेमहांकाळ पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी अन्सर शेख व  विषय तज्ञ सुरेंद्रनाथ सरनाईक उपस्थित होते.


जत : गटशिक्षणाधिकारी दिनकर खरात यांचे प्राथमिक शिक्षक संघ (शि.द.) गटाकडून स्वागत करण्यात आले.