कोरोनात जनतेला मदत करण्याचा प्रयत्न करा,आ.निलेश लंकेचे जत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील यांना आवाहन

जत,संकेत टाइम्स : पारनेर जिल्ह्यातील अहमदनगरचे कोरोना योध्दा आमदार निलेश लंके व जत तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील यांची मुंबई मंत्रालय येथे भेट झाली.
आमदार लंके यांनी कोरोना दुसऱ्या लाटेत केलेल्या प्रभावी काम व सर्वात मोठ्या कोविड सेंटरचे कार्य प्रेरणादायी असल्याचे यावेळी पाटील म्हणाले.


दरम्यान राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जंयत पाटील यांचा मोठा आधार मला मिळत आहे. त्यांना आदर्श मानून काम करा,तालुक्यात नवक्रांती येईल असे यावेळी आ.लंके यांनी सांगितले.


आ.निलेश लंके व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील यांची मुंबईत भेट झाली.