वाळवा,पलूसमुळे नवे रुग्ण दहाच्या आत येऊनही जतेत निर्बंध लादले

जत,संकेत टाइम्स : महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येऊ घातलीय. त्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कोरोना निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सुरुवातीला म्हणजे दुसऱ्या लाटेआधी अमरावती, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर मोठ्या प्रमाणात रुग्ण बाधित निघतायत. चारही जिल्ह्यांतले हे आकडे पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात निर्बंधांचं प्रमुख कारण आहेत.सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या अगदी दहाच्या आत आली आहे, तरीही निर्बंध लादण्यात आले आहेत. जिल्ह्यातील वाळवासह एक दोन तालुक्यात रुग्ण वाढले आहेत. त्यांचा फटका संपुर्ण जिल्ह्याला बसला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येऊ घातलीय. त्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कोरोना निर्बंध लागू करण्यात आले आहेत.सध्या सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट सुद्धा 10 टक्क्यांच्यावर आहे.

वाळवा,पलूस,आटपाडी,कडेगाव,खानापूर जिल्ह्यात वाढलेल्या रुग्णामुळे संपुर्ण जिल्ह्यात निर्बंध लादले जात आहेत.त्यात जत तालुकाही भरडला जाणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जत नगरपरिषदेकडून कडकडीत बंद‌ पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अनेक मोठी गावेही बंद राहणार आहे.चार तालुक्यातील हे आकडे पुन्हा संपूर्ण जिल्ह्यात निर्बंधांचं प्रमुख कारण आहेत.