माडग्याळमध्ये लवकरचं म्हैसाळचे पाणी ; आ.विक्रमसिंह सांवत | परीट तलाव परिसराची पाहणी

माडग्याळ,संकेत टाइम्स : 
माडग्याळ सह परिसराला म्हैसाळ सिंचन योजनेच्या 6 व्या टप्यातून पाणी सोडण्यासाठी नियोजन करा,अशा सुचना आमदार विक्रमसिंह सांवत यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.म्हैशाळ 6 वा टप्प्यातील पाणी माडग्याळ येथील परीट वस्ती तलावात सोडण्याचे‌ तातडीने नियोजनासाठी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी,शेतकऱ्यांसह पाहणी दौरा केला.

म्हैशाळ 6 वा टप्प्यातून पाणी तालुक्यातील उमदी पर्यत पोहचले आहे.मात्र माडग्याळ भागात पाणी आलेले नाही.माडग्याळच्या बाजूनेच पाणी पुढे जात आहे.पाणी उशाला, पण कोरड घशाला अशी परिस्थिती माडग्याळकरांची झाली आहे.6 व्या टप्प्यातील कँनॉलमधून जात असलेले पाणी परीट वस्ती येथील तलावात पाणी सोडण्याचे नियोजनासाठी आ.सांवत व अधिकाऱ्यांनी पाहणी केली. सुमारे 600 मिटर खुदाई पाणी करून परीट वस्ती तलावात सोडल्यास माडग्याळ व सोन्याळ मधील बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल,असे सोमाण्णा हक्के व सरपंच अप्पासाहेब जत्ती यांनी सांगितले,कॅनल पासून ते तलावापर्यंत पूर्ण पाहणी करण्यात आली. 2 ते 3 दिवसात सर्व्हे करून कोणत्या पद्धतीने पाणी सोडण्यास सोपे जाईल पहा, अशा सूचना आमदार विक्रमसिंह सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 


त्यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग,रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे,जिल्हा परिषद सरदार पाटील,कार्यकारी अभियंता कुमार पाटील,उपविभागीय अधिकारी अभिमन्यू मासाळ, उपविभागीय अभियंता बाबासाहेब पाटील,श्री.पुरोहित ,सरपंच अप्पासाहेब जत्ती, तज्ञ संचालक विठ्ठल निकम, काँग्रेसचे नेते व्हन्नाप्पा माळी, संतोष पाटील सोन्याळ, 


माजी सरपंच सुरेश ऐवाळे,माजी उपसरपंच लक्ष्मण कोरे, शिक्षक पदवीधर संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम सावंत सर तालुकाध्यक्ष राजू कांबळे,युवा नेते मच्छिन्द्र सावंत, शेतकरी नेते बाळू कोरे, माजी व्हा.चेअरमन पांडुरंग निकम, युवक नेते दशरथ सावंत, राष्ट्रवादीचे नेते नागेश ऐवाळे, निंगाप्पा कोरे, नागाप्पा कोरे, रुद्राप्पा कोरे, केशव सावंत आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.


माडग्याळ ता.जत येथे म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यासाठी परिसराची पाहणी करण्यात आली.