ओबीसी आरक्षण,रद्दच्या निषेधार्थ जतेत कॉग्रेस,भाजपचे आज आंदोलन

जत,संकेत टाइम्स : जतेत आज शनिवारी ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या निर्षेधार्थ भारतीय जनता पार्टी व कॉग्रेसच्या वतीने वेगवेगळी आंदोलने करण्यात येणार आहे. उद्घाटन,भूमिपुजना पासूनचा दोन्ही पक्षाचा संघर्ष आंदोलना पर्यत कायम आहे.


दोन्ही पक्षाच्या वतीने आंदोलनाच्या सुचना कार्यकर्त्यांना सोशल मिडिया वरून दिल्या आहेत.भाजपचे राज्यव्यापी आंदोलनाला पांठिबा देण्यासाठी जत येथील महाराणा प्रताप चौकात सकाळी 10 वाजता माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे.

तर जत तालुका कॉग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारीच पेठेतील मारूती मंदिर,(गांधी सर्कल)येथे सकाळी 10 वाजता आमदार विक्रमसिंह सांवत यांचे नेतृत्वाखाली जनआंदोलन करण्यात येणार आहे. दोन्ही पक्षाच्या वतीने सामील होण्याचे आवाहन केले आहे.