कुंभारीत वयोवृद्ध महिलेचा मृत्तदेह आढळला

जत,संकेत टाइम्स : कुंभारी ता.जत‌ येथील वयोवृद्ध लक्ष्मी शंकर माळी,(वय 95 रा.माळी वस्ती कुंभारी)यांचा‌ मयत स्थितीतील मृत्तदेह ओढ्यातील बंधाऱ्यात आढळून आला.
गेल्या दोन दिवसापासून लक्ष्मी घरातून निघून गेल्या होत्या.त्या अनेक दिवसापासून आजारी होत्या.दोन दिवसापुर्वी त्यांचे चिरंजीव महादेव शंकर माळी यांनी लक्ष्मी माळी हरविल्याची तक्रार पोलीसात दिली होती.गुरूवारी सकाळी त्यांचा मृत्तदेह पाण्यात तरंगताना आढळून आला.पोलीसांनी मृत्तदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला.दरम्यान लक्ष्मी पाण्यात कशा पडल्या याबाबत नेमकी माहिती कळू शकली नाही.