पुन्हा या गावातील जूगार अड्ड्यावर पोलीसाची कारवाई

जत : गुगवाड (ता. जत) येथील अंदानी
किराणा दुकानांच्या पाठीमागे जुगार
अड्डयावर पोलिसांनी छापा टाकला.यात
सिद्राया हुचाप्पा नाईक व बाळू
आप्पासाहेब सनदी (दोघे रा. गुगवाड)
यांच्याकडून 4 हजार 680 रुपये
किमतीचा मुद्देमालासह ताब्यात घेतला
आहे. आरोपीच्या विरोधात जत पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल आहे.


बाळू सनदी यांच्या त्याच्याकडून
कमिशन घेऊन सिद्राया नाईक हा जुगार
घेत असल्याची माहिती पोलिसांना
मिळाली होती. त्याआनुषंगाने पोलीस
निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन
हाक्के, पोलीस शिपाई शरद शिंदे यांनी
कारवाई केली.दरम्यान, जत, उमदी आणि संख येथील पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी जत तालुक्यातील अवैध व्यवसायावर कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार त्यांनी तालुक्यात छापे मारले जात आहेत.