प्रदिप करगणीकर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख

माडग्याळ, संकेत टाइम्स : माडग्याळ ता.जत येथील युवा नेते प्रदिप भिमराव करगणीकर यांची शिवसेना उप जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली.शिवसेना भवनमधून त्याबाबत अधिकृत्त घोषणा करण्यात आली आहे.
शिवसैनिक,माडग्याळचे उपसंरपच,शिवसेना तालुका प्रमुख या पदावर प्रदिप करगणीकर यांनी काम केले आहे.


शिवसेनाच्या पडत्या काळात ते शिवसेनेचे प्रभावी काम करत होते.माडग्याळ ग्रामपंचायतीवर त्यांनी शिवसेनेची सत्ता आणण्याची किमया साधली होती.
तालुकाध्यक्षपदी असताना त्यांनी शिवसेनेचा दबदबा कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे.
तालुक्यात पडलेल्या तीव्र दुष्काळाच्या काळात तालुक्यातील पहिली जनावरांची छावणी त्यांनी चालू करत पुर्व भागातील जनावरांना चारा उपलब्ध करून दिला होता.दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या जत तालुक्यात तत्कालीन शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना माडग्याळ येथे आणून तालुक्याची दुष्काळी परिस्थिती दाखविण्याचा‌ प्रयत्न केला होता.शिवसेनेच्या‌ माध्यमातून त्यांनी अनेक कामे केली आहेत.पुर्व भागात‌ त्यांना माननारा मोठा वर्ग आहे.पक्षाने त्यांना मोठी जबाबदारी देत,पक्ष वाढविण्याचे शिवधनुष्य त्यांच्याकडे दिले आहे.
जत तालुक्यात शिवसेना गतवैभव आणण्यासाठी माझा प्रयत्न राहिल,पक्ष नेतृत्वाने दिलेल्या संधीचे सोने करण्याचा माझा प्रयत्न राहिल.


त्याशिवाय तालुक्यातील सिंचन योजना,रस्ते,तालुका विभाजन अशा प्रश्नासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाआघाडीच्या सरकारच्या माध्यमातून मी प्रयत्न करेन असे निवडीनंतर करगणीकर यांनी सांगितले. 
दरम्यान करगणीकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.