ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक | महामार्गावर चक्काजाम | माजी आमदारांचे विद्यमान आमदारावर गंभीर आरोप

जत,संकेत टाइम्स : जतचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सांवत यांनी मोठ्या प्रमाणात बेहिशोबी माया गोळा केली आहे, लाचलुचपत विभागाने नुकत्याच पकडलेल्या अधिकाऱ्यांने फोन रेकार्डमध्ये त्यांचे नाव घेतले आहे, त्यामुळे त्यांची इडीकडून चौकशी करा,अशी मागणी आमदार विलासराव जगताप यांनी केली.
ओबीसी आरक्षणासाठी भाजपच्या वतीने जतेत शांततेत आंदोलन करण्यात आले. 


शहरात विजापूर-गुहागर रस्त्यावर महाराणा प्रताप चौकात आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आलं.त्यावेळी माजी आमदार पत्रकारांशी बोलत होते.
माजी आमदार जगताप म्हणाले,
जत तालुक्यातील शासकीय कार्यालयात बोकाळलेल्या भ्रष्टाचार हा आमदार सांवत हे कारणीभूत आहेत.सांवत यांनी मार्केट कमिटी,शासकीय कार्यालयातून ही शेवटची संधी आहे,म्हणून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले आहेत.


जगताप म्हणाले,लाचलुचपतच्या छाप्यात साडलेल्या अधिकारी वाळू,माती सारख्या धंद्यात पैसे लुटून सोकावला होता.त्याने साधे माती वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांचे डंपर पकडून सोडविण्यासाठी दोन-तीन लाखाची मागणी केली होती.अशा लोकांना लुटणाऱ्या अधिकाऱ्यां विरोधात झालेल्या उद्रेकामुळे ही कारवाई झाली आहे.हे मोठे रँकेट तालुक्यात कार्यरत आहे,ते तलाठी,प्रांत पर्यत मर्यादित नाही तर त्याचे मुळ आमदारापर्यत असल्याचाही गंभीर आरोप जगताप यांनी यावेळी केला आहे.त्यामुळे या सर्व प्रकाराची इडीकडून चौकशी करावी,असेही जगताप म्हणाले.


माजी आमदार विलासराव जगताप,तालुकाध्यक्ष सुनिल पवार यांच्या नेतृत्वात नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.जवळपास तासभर चक्का जाम आंदोलन झाल्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती. मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या.



जत शहरातील विजापूर-गुहागर रस्त्यावर ओबिसी आरक्षणासाठी भाजपच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य तम्मणगौडा रवीपाटील,नगरसेवक उमेश सांवत भाजपा युवा मोर्चाचे‌ जिल्हा उपाध्यक्ष संग्राम जगताप, तालुकाध्यक्ष बसवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.