वनपाल गणेश दुधाळ यांनी दिले घोणस सर्पास जीवदान !

0



जत,संकेत टाइम्स : जत‌ वन विभागाच्या वनपाल गणेश दुधाळ व प्रकाश गडदे यांनी शेततलावात पडलेल्या घोणस जातीच्या सर्पाला सुरक्षित पाण्याबाहेर काढत जीवदान देत,नैसर्गिक अधिवासात सोडले.

सविस्तर माहिती अशी,

जत वन क्षेत्रातील मौजे येळदरी येथील वाघमारे सर यांच्या शेततलावात पाण्याच्या शोधात असलेला घोणस जातीचा साप पाण्यात पडला असल्याची माहिती जत वनविभागास मिळाली.





तात्काळ जतचे वनपाल गणेश दुधाळ व वाळेखिंडीचे प्रकाश गडदे हे घटनास्थळी पोहचले.त्यांनी तलावाची पाहणी करत एकमेकाचे हात पकडून तब्बल अर्धा तासांच्या अथक प्रयत्नातून सर्पाला काठीच्या साह्याने पाण्याबाहेर काढत जीवदान दिले.व सर्पाचा नैसर्गिक अधिवास असलेल्या जंगल क्षेत्रात सोडून देण्यात आले.

दरम्यान अचानक सर्पाचे दर्शन झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले होते.दुधाळ व गडदे यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Rate Card


 येळदरी ता.जत येथे शेततलावात पडलेल्या घोणस जातीच्या सर्पाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याबाहेर काढत जीवदान दिले.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.