युवकांचे संघटन पक्षाला मजबूती देईल ; विराज नाईक | जतेत राष्ट्रवादीची संवाद बैठक

जत,संकेत टाइम्स : युवकांचे संघटन पक्षासाठी महत्त्वाचे आहे, आणि युवक हा पक्षाचा कणा आहे, येत्या काळात युवकांचे मजबूत संघटन बांधणीसाठी आपण प्रयत्न करायचा आहे,असे प्रतिपादन युवकांचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी केले.जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक झाली त्यावेळी नाईक बोलत होते 


यावेळी श्री.नाईक व 
महिला जिल्हाध्यक्षा सुश्मिताताई जाधव यांचे स्वागत करण्यात आले. 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील,सरचिटणीस अल्काताई माने, युवती जिल्हाध्यक्षा पूजाताई लाड,ओएसडी अमोल डफळे, जत तालुकाध्यक्ष रमेश पाटील,जेष्ठ नेते सुरेशराव शिंदे सरकार, कार्याध्यक्ष उत्तम चव्हाण,पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी शिंदे,संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग उपस्थित होते.विराज नाईक म्हणाले,लवकरचं युवकांचे संघटन बांधणीसाठी मुलाखती घेऊनच नियुक्ती करण्यात येणार आहेत, तालुक्यातील संघटन बांधणीसाठी मी स्वतः तुमच्यासोबत कार्यरत राहणार आहे व त्यासाठी कोणतीही अडचण असल्यास प्रत्येक कार्यकर्त्यांसोबत मी असणार आहे.
सुश्मिताताई जाधव, महिलांना बळ देणे ही आपल्या पुरुष पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे,मी तळागाळातील महिलांशी स्वतः संपर्क साधणार आहे. मला आपल्या साथीची गरज आहे. आपण सर्वांनी पुढाकार दिलात तर आपण नक्कीच एक चांगलं संघटन उभारू शकतो, माझी पूर्ण तयारी आहे, फक्त आपली साथ पाहिजे. 


सुरेशराव शिंदे,पक्षाचे संघटन वाढीसाठी आम्ही सर्वच तालुक्यातील नेतेमंडळी एकत्र झालो आहोत.आमच्यापैकी कोणाचाही गट तट नाही आहे.आम्ही सर्वच एकदिलाने कामाला लागलो आहोत.वरिष्ठ पातळीवरून सहकार्य मिळावे, तालुका राष्ट्रवादीमय करून दाखवूच.कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत डगमगू नका, काही अडचण आल्यास आम्हाला सांगा आम्ही सदैव तुमच्या सोबत राहू.


यावेळी सरचिटणीस सचिन होर्तिकर, युवक जिल्हा उपाध्यक्ष अशोक कोळी,तालुका उपाध्यक्ष मच्छिंद्र वाघमोडे, तालुका महिलाध्यक्षा मिनाक्षीताई अक्की, श्रद्धा शिंदे, जेष्ठ नेते सिद्धू शीरशाड, वक्ता विभाग तालुकाध्यक्ष लक्ष्मण कदरे, राहूलसिंह डफळे, राजेसाहेब डफळे, , शशिकांत कोडग, प्रतापराव शिंदे, इम्रान गवंडी, शफीक इनामदार, विकास लेंगरे, राजू मुल्ला,पवन कोळी,संतोष देवकर, रियाज शेख,तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.
सूत्रसंचालन लक्ष्मण कदरे, शफीक इनामदार यांनी केले.


जत येथील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नविन पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.