माडग्याळ गाव समृद्ध होणार : प्रसाद देशपांडे | समतल चर कामास सुरूवात

माडग्याळ, संकेत टाइम्स : सेवावर्धनी संस्था पुणे आणि शेती परिवार कल्याण संस्था आटपाडी यांच्या सयूंक्त विद्ममाने  जलदूत प्रकल्प अंतर्गत माडग्याळ येथे माळरान व गायरान भागात 'खोल सलग समतल चर' कामाचे उद्घाटन जत पंचायत समितीचे उपसभापती विष्णु चव्हाण, सरपंच इराण्णा जत्ती यांचे शुभ हस्ते  करण्यात आले.यावेळी प्रसाद देशपांडे,संस्थेचे जलदूत संदीप सावंत, श्रीमती अश्विनी कासार,जलदूत पांडुरंग सावंत,अर्जुन सावंत,समन्वयक तुकाराम पाटील, गुरू माळी,डॉ प्रदीप शिंदे,डॉ श्रीनिवास कुलकर्णी, बाळासाहेब सोलनकर सहित ग्रामस्थ उपस्थित होते.
      


यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष  प्रसाद देशपांडे,संदीप सावंत म्हणाले, जत तालुक्यात दुष्काळ मोठा आहे.माडग्याळ गावाचा अभ्यास करून गावाची पातळी वाढावी या उद्धेशाने माडग्याळ गावाच्या सभोवताली डोंगरावर व माळरानावर  डीपसीसीटीचे जवळपास 150 एकरवर काम होणार आहे.संपुर्ण काम झाल्यास आमची संस्था चारा तयार करण्यासाठी बिया पुरवणार आहे.त्यामुळे माडग्याळ गावाचा पाण्याबरोबर,चारा, दूध,मांस,पशु, शेतीचा प्रश्न सुटणार आहे.


माडग्याळ ता.जत येथे जलदूत प्रकल्पाअतर्गंत समतल चर कामाचे उद्घाटन करण्यात आले.