जत शहरात पुन्हा राडेराड | कोट्यावधी निधीच्या खर्चानंतरही परिस्थिती बदलेना

0



जत,संकेत टाइम्स : शहर विकासाचे तर सोडाच साधे रस्ते, नाले आणि पाण्याच्या प्रश्नावर सुद्धा नगरपरिषद जन सुविधा पुरविताना कमी पडत आहे. ते भ्रष्टाचाराच्या कुंभकर्णी झोपेत असल्याने नागरीकांना रस्त्यातील खड्ड्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने नगरपालिकेला

जागे करण्यासाठी नागरिकांनीच आता तीव्र आंदोलन उभारण्याची गरज आहे.





जनतेच्या कराच्या पैशातून

जनसुविधा उभारण्याचे नियोजनाचे

कर्तव्य नगरपरिषदेकडे असताना आजही नगरपालिका कार्यक्षेत्रातील सुविधा बाबत कुंभकर्णी झोपेत असलेल्या नगरपरिषदेचा लाजीरवाणा कारभार भ्रष्टाचारात व्यस्त असल्यामुळे जत नगरपरिषद चर्चेचाच नव्हेतर निषेधाचा विषय बनली आहे. 





त्यामध्ये जतकरांना

सुविधा मिळत नसल्याने शहराची अवस्था खेड्यापेक्षाही बत्तर असल्याची परिस्थिती आज मितीस पहायला मिळत आहे.त्यामुळे सोसाव्या लागणाऱ्या वेदना,समस्याचा पाढा नेहमी वाचूनही नगरपालिकेवर कोणताही परिणाम होत नाही असा आरोप होत आहे.




ज्या नगरपरिषदेचा उगम जत शहरातील कायदे तज्ञ अँड.श्रीपाद अष्टेकर यांनी न्यायालयीन लढाईतून झाला झाला.तत्कालीन ग्रामपंचायतीला जतचा विकासाला मर्यादा पडत असल्याने नगरपरिषद झाल्याने विकास होईल,असा कयास लावण्यात आला होता.मात्र भ्रष्ट राजकारण व पदाधिकाऱ्यांची विकास करणे अशी मानसिकता नसल्याने जवळपास आठ वर्षे होऊनही कारभार ग्रामपंचायतीचा सुरू आहे.





पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे खिसेभरू धोरण विकास कामांना खिळ घालणारा ठरला आहे.तालुक्यातील विकासाचा सुंदर चेहरा खऱ्या अर्थांने तालुक्याला दाखविण्याची संधी वरिष्ठ नेत्यांना होती,मात्र त्यांच्या दुर्लक्षाने नगरपरिषदेचा सर्वच कारभार तपासण्याची गरज आहे.


Rate Card





खड्डे,राडेराड आठ वर्षानंतरही कायम 


जत शहरात नगरपरिषद स्थापनेला 8 वर्षाचा काळ लोटला तरीही रस्त्यातील खड्डे,राडेराड कायम आहे.अनेक नव्याने केलेल्या रस्त्यावर थेट पाण्याचे डोह उभा राहत आहेत.तर अजून दुरूस्तीच्या प्रतिक्षेत असलेले रस्ते खड्डे,राडेराड कायम आहे.






नालेसफाई कागदावर 


जत शहरातील ओढे, नाल्याची स्वच्छता नगरपरिषद स्थापनेपासून अद्यापर्यत एकदाही झालेली नाही.त्यामुळे शहरातून वाहनारे दोन ओढे,व छोटे,मोठे नाले कचऱ्यांने तुंडूब भरले आहेत.त्यामुळे पावसाळ्यात तूफान पाऊस झाला तर थेट पाणी रहवाशी भागातील घरात घुसते,तरीही नाल्याची स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.



शहरातील रस्त्याची झालेली दुरावस्था, नगरपरिषदेचा द्ररिद्रीपणा दाखविते.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.