तहसीलदार म्हेत्रेच्या घराची झडती | अनेक महत्वाची कागदपत्रे जप्त ; घबाड सापडण्याची शक्यता

जत,संकेत टाइम्स : संखचे‌ अपर तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांच्या संख येथील घराची लाचलुचपत विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात झडती घेतली.यात लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
दरम्यान नेमके काय जप्त केले याबाबत मात्र त्यांनी माहिती दिलेली नाही.मात्र म्हेत्रे यांच्या घरात मोठे घबाड सापडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली.


वळसंग येथील एका तक्रारादारचे माती उत्खनन प्रकरणी जप्त केलेले वाहन सोडविण्यासाठी संखचे अपर तहसीलदार हणमंत म्हेत्रे व तलाठी विशाल उदगीर यांना 2 लाख 30 हजाराची लाच स्विकारताना मंगळवारी लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते.तेव्हा म्हेत्रे फरारी झाले होते.त्यामुळे संख येथील त्यांचे घर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सील केले होते.बुधवारी ते स्व:ता लाचलुचपत विभागाच्या सांगली येथील कार्यालयात हजर झाले होते.


त्यांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या पथकाने गुरूवारी म्हेत्रे यांच्यासह थेट संख येथील त्यांचे घर गाठले त्यांच्या उपस्थितीत घराची झडती घेतली.यावेळी पोलीस बंदोबस्तही तैनात केला होता.
या झडतीत अनेक महत्वाची कागदपत्रे अधिकाऱ्यांच्या हाताला लागल्याचे समजते.मात्र नेमके काय येथे जप्त केले यांची माहिती गुलदस्त्यात ठेवली आहे. दरम्यान लाचखोर म्हेत्रे यांने या भागातील शेतकरी,नागरिकांना लुटले असून तलाठी उदगीर सारखे अनेक तलाठी त्यांनी एंजन्ट म्हणून नेमले होते.त्यांच्या माध्यमातून दररोज लाखो रूपयाची काळी माया म्हेत्रे जमा करत असल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे म्हेत्रे यांची विना अडथळा चौकशी झाल्यास त्यांच्याकडे मोठे घबाड सापडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.


महसूलच्या अशा बड्या अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्यामुळे खळबळ उडाली असून जत येथील काही लाचखोर अधिकारी,वरिष्ठ लिपिकांना या कारवाईमुळे हादरा बसला आहे.जतचा पदभार असतानाही म्हेत्रे यांनी काही काळेभेर केले आहे का?यांचीही तपासणी होण्याची शक्यता आहे.