जत औद्योगिक वसाहतीला ‘अ’ वर्गमध्ये रुंपातरित करावे

0



जत,संकेत टाइम्स : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ( लघु क्षेत्र) जत या क वर्ग औद्योगिक वसाहतीचे अवर्ग वसाहतीमध्ये रूपांतर करण्यासाठी आ.विक्रमसिंह सावंत यांनी राज्याचे उद्योगमंत्री ना.सुभाष.देसाई यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबतीत चर्चा करावी अशी मागणी उद्योजकांकडून करण्यात येत आहे.






तालुक्यातील उद्योगधंद्याना चालना मिळावी व चांगल्या प्रकारे उद्योगधंद्याना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने जत शहरालगत असलेल्या विजापूर-गुहागर या मार्गावर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (लघु क्षेत्र) उभारणी केली आहे. 

या औद्योगिक वसाहतीकडे उद्योग भवनच्या जिल्हास्तरावरील अधिकारी यांचे नियंत्रण आहे.जत येथिल औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक व्यवसाईकानी आपले उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत.






यामध्ये दूग्ध व्यवसाय, टायर रिमोल्डींग व्यवसाय, फरशी व्यवसाय, तेल रिफायंडरी,हाॅटेल आदी व्यवसाय सुरू आहेत.मात्र ज्या मुळ व्यवसाईकांच्या नावावर या वसाहतीमध्ये प्लाॅट आहेत.त्यापैकी बरेच जण हयात नाहीत. त्यांच्या मृत्यूनंतर ते प्लाॅट त्यांच्या वारसांना वारसा हक्काने मिळाले आहेत.




Rate Card



वसाहतीमध्ये बहुतांशी प्लाॅट हे रिकामे आहेत.त्या प्लाॅटवर कसल्याही प्रकारचे बांधकाम करण्यात आले नाही.हे रिकामे असलेले प्लाॅट वर्षानुवर्षे रिकामेच राहीले आहेत.तर येथिल प्लाॅट अधिकृत ज्यांच्या नावावर आहेत.त्या व्यक्तीनी आपले प्लाॅट दुसरे व्यवसाईकांना व्यवसायासाठी भाड्याने दिले आहेत. तर काहीनी बेकायदेशीररित्या आपले प्लाॅट कायमस्वरूपी कुलमुखत्यार पत्राने मोठ्या दुध संघाना व्यवसायासाठी दिले आहेत. 

या औद्योगिक वसाहतीमध्ये अनुसूचित जाती या वर्गाच्या लोकांना तीन टक्के भूखंडाचे वाटप करावे अशी मागणी आहे.






तत्कालिन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी अनुसूचित जाती या वर्गाच्या लोकांना औद्योगिक वसाहतीमध्ये तीन टक्के भूखंडाचे वाटप करण्याचे आश्वासन दिले होते.ते अश्वासन महाविकास आघाडी सरकारने पूर्ण करावे अशी मागणी सातत्याने होत आहे.जे प्लँट मुळ मालकांनी कोणतेही उद्योग उभे न करता इतरांना भाड्याने दिले आहेत. त्यांची चौकशी करावी, अशीही मागणी होत आहे.


    


जत येथील औद्योगिक वसाहत

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.