मोरबगीत होणार सुसज्ज‌ शाळा इमारत

भिवर्गी, संकेत टाइम्स : मोरबगी (ता.जत) येथे जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेच्या इमारत बांधकामाचे भूमिपुजन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील,सरपंच कविता मांग,उपसरपंच राजकुमार नंदूर,ग्रा.पं.सदस्य शोभा बगली, परमेश्वर खरात,पुजा  सोनकनल्ली,भिमराव कांबळे,पार्वती बिरादार,अंबव्वा बालगाव,मल्लिकार्जुन  मठ उपस्थित होते.


यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की,विद्वेविना मती गेली,मती विना गती गेली,गती विना वित्त खचले,
इतके अनर्थ एक अविद्वेने केले.
हे वाचून आपल्याला आठवण झाली असेल फुले घराण्याची ज्यांनी समाजाला सुशिक्षित करण्यासाठी जीवाचं रान केलं,शिक्षणामुळे समाजात विशिष्ट बदल होऊ शकतो हे त्यांनी त्या वेळेसच सांगितले होते.शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.चांगल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांमधील सर्वोत्तम गुण बाहेर कसे आणावे हे माहिती असत.
आपल्या आजूबाजूला कोणीही अशिक्षित राहू नये, याची जबाबदारी आपण एक सुजाण नागरिक म्हणून घ्या. शिक्षण माणसाला त्याच्या अधिकारांची जाणीव करून देते, जीवनाला वेगळं वळण देण्याचे काम सुद्धा शिक्षणच करते.जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील म्हणाले की,शिक्षण म्हणजे वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे,भावनेला माणुसकीकडे शरीराला,श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण,शिक्षण ही कुऱ्हाड आहे,जे अज्ञानाचे जंगल तोडण्यास आपले सहकार्य करते.शिक्षण हे खूप शक्तीशाली हत्यार आहे, तुम्ही त्याने जग बदलू शकता.
मोरबगी ता.जत येथील शाळा इमारत बांधकामाचे भूमीपुजन करताना आमदार विक्रमसिंह सांवत, व मान्यवर