रामपूरचे पवार कॉग्रेसमध्ये सल्लागार कसे ; सुनिल पवार

जत,संकेत टाइम्स : जत काॅंग्रेसच्या नेत्यांमध्ये मनरेगाविषयी टिकात्मक बोलण्याची एक फॅशनच निर्माण झालीय,मनरेगामध्ये भ्रष्टाचार झाला,अनियमितता झाली म्हणून बोंबाबोंब करून एका चांगल्या योजनेची कॉग्रेस नेत्यांनी वाट लावली आहे,असा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार यांनी केला आहे.
त्यांनी कॉग्रेस नेत्यांनी एक अनावृत्त पत्र सोशल मिडियावरून लिहले आहे.

पवार पुढे म्हणाले,2012 ते 2017 या पाच वर्षात ,तालुक्यातल्या प्रत्येक गावांत मनरेगाच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांची कामे आम्ही केली,हजारो लोकांची कुटुंबे चालविली ,हजारो लोकांना आठवड्याला रोख चलन मिळवून दिले ,हजारो लोकांचे जीवनमान आम्ही सुधारले.नेमके हेच या काॅंग्रेस नेत्यांना पाहवले नाही म्हणून मनरेगा योजना यांनी बंद पाडली ,तक्रारी केल्या.मनरेगा ही योजना नियमावर बोट ठेवून चालविता येत नसते,कायद्यानियमांकडे थोडेसे दुर्लक्ष करून निधी खेचून आणायचा असतो 

आम्ही पाच वर्षात 100 कोटीहून अधिकचा निधी तालुक्यात खर्च केला आहे.रामपूरच्या मनरेगा कामांच्या तक्रारीसाठी जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी अनेक तक्रारी केल्या,आज त्याच मारूती पवारांना आमदार सांवत सोबत घेऊन फिरत आहेत.
पवार भाजपामध्ये असतांना सोनेरी टोळीचे सरदार आणि काॅंग्रेसमध्ये आले की तुमचे सल्लागार !,हे कसले मापदंड म्हणायचे ? 

पवार पुढे म्हणाले,
जत तालुका काॅंग्रेसचे अध्यक्ष अप्पासाहेब बिराजदार रा.मुचंडी हे 2012 साली पं.स.ला आमची सत्ता आल्यानंतर आमचेकडे आले होते.त्यांच्या मुचंडी गावचे 43 लाखांचे मनरेगाचे बिल पेंडींग होते ,स्वर्गीय बिडीओ इटाई मॅडम यांच्या विनंतीवरून आम्हीच ते बील काढून देण्यासाठी बिराजदार यांना मदत केली होती,आणि आज तेच अध्यक्ष मनरेगाच्या नावाने उलट्या बोंबा मारत असतात,त्यावेळी मॅन्युअल मस्टर्स होती,जर हे खोटे असेल तर मुचंडी दर्‍याप्पाच्या मंदिरात क्रिया करायला मी केव्हाही तयार आहे.
गेल्या दोन वर्षामध्ये म्हैसाळ योजनेसाठी एका रूपयाचाही निधी आला नाही व पुढील तीन वर्षामध्ये म्हैसाळ योजनेसाठी थोडासुद्धा निधी येईल असे दिसत नाही.


उमदीपर्यंत पोहोचलेल्या म्हैसाळच्या पाण्यासाठी दिलेला निधी फडणवीस सरकारने दिला होता,काॅंग्रेस सरकारच्या कालावधीत फक्त पाईपातून पडणार्‍या पाण्याची उद्घाटने होत आहेत,ही माझी विधाने खोडून काढायचे असल्यास मी कधीही,कोणत्याही व्यासपीठावर जाहिर चर्चेस तयार आहे,असे आवाहनही पवार यांनी कॉग्रेस नेत्यांना केले आहे.