पोषण आहाराचा लाभ बँक खात्यात करण्याचा निर्णय रद्द करावा ; धरेप्पा कट्टीमनी

0



जत,संकेत टाइम्स : गेल्यावर्षी उन्हाळी सुटीच्या कालावधीचा पोषण आहार विद्यार्थ्यांना शाळेतून वितरित करण्यात आला, तीच पद्धत योग्य आहे. मात्र, आता या आहाराचा लाभ डीबीटीव्दारे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा  निर्णय घेण्यात आला. या आदेशानुसार  प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे सर्व सबंधित यंत्रणेसाठी जिकिरीचे आहे. विद्यार्थ्यांचे खाते काढण्याबाबत बँक व्यवस्थापनाचे नकारार्थी धोरण,अडचणी वाढविणारे आहे. हा सर्व शिक्षकांचा आणि पालकांचा अनुभव असल्याने हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते धरेप्पा कट्टीमनी यांनी केली आहे.






नुकतीच अशी मागणी शिक्षक समितीकडून राज्याच्या शिक्षण संचालकांकडे केली आहे.

कट्टीमनी म्हणाले,शालेय पोषण आहार योजनेंतर्गत 2021 मधील उन्हाळी सुटीच्या कालावधीतील लाभ डीबीटीद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्याची कार्यवाही करण्यासंदर्भात शिक्षण संचालकांनी पत्र काढले आहे.त्यामध्ये उन्हाळी सुटीतील लाभ बँक खात्यात एकवेळ जमा करण्याचे नमूद आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात शिक्षक समितीची मागणी केवळ उन्हाळी सुटी कालावधीतील रक्कम जमा करावयाची आहे. दोन महिन्यातील अंदाजित कार्य दिवस 35 गृहीत धरल्यास इयत्ता पहिली ते पाचवीसाठी दर दिवशी 4.48रुपये दराने एकूण 156 रुपये 80 पैसे आणि इयत्ता सहावी ते आठसाठी दर दिवशी 6.71 रुपये दराने एकूण 234 रुपये 85 पैसे जमा होतील.

Rate Card






अशा अत्यल्प रोख लाभासाठी मोलमजुरी करणाऱ्या पालकांना आपल्या पाल्याचे बँकेत खाते काढण्यासाठी मजुरी किंवा दैनंदिन कामे टाकून जावे लागणार आहे. एकदा जाऊन बँकेत काम होत नाही, त्याकरिता दोन ते तीन चकरा माराव्या लागतात,असा अनुभव आहे. नंतर खाते पुस्तक आणण्यासाठी शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी पालकांना बँकेत वारंवार जाणे.त्याकरिता रोजमजुरी बुडविणे हे संयुक्तिक होणार नाही. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा,अशी मागणी कट्टीमनी यांनी केली आहे.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.