...थेट आमदारांनी केली पेरणी,बिज प्रक्रिया,बांधावर बीज वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या बीज प्रक्रिया मोहिमे अतर्गंत बेळोंडगी येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात जतचे आमदार विक्रमसिंह सांवत यांनी थेट पेरणी यंत्रावर बसून पेरणी करत आपणही शेतकरीचं असल्याचे स्पष्ट केले.
भारती बँकेचे अधिकारी ते‌ कॉग्रेसचे बडे नेते आमदार येथंपर्यत खडतर प्रवास केलेले आमदार विक्रमसिंह सांवत यांचे जत तालुक्यातील शेतकऱ्यांना सुख,समाधान लाभावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


शेतीसाठी कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करण्यासाठी तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यत सिंचन योजना पोहचली पाहिजे यासाठी ते गेल्या दशकापासून प्रयत्नशील आहेत.विशेष करून सीमावर्ती असणाऱ्या जत तालुक्यातील गावांना कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी मिळावे,असा त्यांचा प्रयत्न आहे.


शेतीशी बांधिलकी जपणारे आ.विक्रमसिंह सांवत यांनी शुक्रवारी कृषी विभागाच्या बेळोंडगी येथील बांधावर बीज वाटप कार्यक्रमास उपस्थिती लावली.अनपेक्षितपणे थेट पेरणी यंत्रावर बसून त्यांनी पेरणी करून आपणही शेतकरी असल्याचे सिध्द केले.बेळोंडगी येथील बीज प्रक्रिया मोहिम व बांधावर बीज वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ आ.सांवत यांच्याहस्ते झाला.
यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग, संतोष पाटील,धरेप्पा हत्तळी,सुरेश हत्तळी,संरपच,ग्रा.प.
सदस्य, कृषी मंडळ अधिकारी श्री.लांडगेसह कृषी सहाय्यक,सेवक शेतकरी उपस्थित होते.


आमदार विक्रमसिंह सांवत यांनी थेट पेरणी यंत्रणाचा ताबा घेत पेरणी केली.