जतला कर्नाटकातून पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा ; कॉग्रेस

जत,संकेत टाइम्स : दुष्काळी जत तालुक्यातील वंचित 47 व अंशत: 17 अशा 67 गावांना कर्नाटक राज्यातून जतला पाणी मिळावे या मागणीला आता चांगले यश मिळत आहे,असे‌ कॉग्रेस नेत्याकडूनही सांगण्यात आले.
कर्नाटक राज्यातून जतला सोयीस्करपणे पाणी मिळू शकते ही संकल्पना घेऊन जतचे आमदार विक्रमसिंह सावंत गेली अनेक वर्षे लढा देत आहेत दुष्काळी जत तालुका कोणत्या का होईना योजनेतून सिंचनाखाली आणणे ही तळमळ व भूमिका आमदार विक्रमसिंह सावंत यांची नेहमीच राहिली आहे.आज (ता.19)राज्याचे जलसंपदा मंत्री,सांगलीचे सुपुत्र दुष्काळी जतवर नेहमीच प्रेम करणारे ना.जयंतराव पाटील साहेब यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा,जलसंपदा मंत्री,पाटबंधारे
विभाग यांचे वरिष्ठ अधिकारी यांचे समवेत बेंगलोर येथे बैठक घेऊन जतला पाणी देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली,तसेच दोन्ही राज्यात यासंदर्भात आंतरराज्य करार करण्यासंदर्भात चांगली चर्चा झाली आहे.यामुळे पावसाळ्यासह उन्हाळ्यातही दोन्ही राज्यांच्या समन्वयाने हे पाणी जत तालुक्याला मिळणे आता नक्कीच शक्य होणार आज जत तालुक्याच्या दृष्टीने कुठलाही पक्षीय वैचारिक मतभेद न मानता घेण्यात आलेल्या हा निर्णय अभिनंदनीय व क्रांतिकारी असा आहे.जत तालुक्याच्या वतीने ना.जयंतराव पाटील,ना.डॉ.विश्वजित कदम ,लोकप्रिय आमदार विक्रमसिंह सावंत तसेच कर्नाटक सरकारचे मनस्वी आभार मानण्याचा आहे,असे कॉग्रेस कार्यकत्यांचे फलक सोशल मिडियावर फिरत होते.
एंकदरीत जत तालुक्यात कर्नाटकातून पूराचे पाणी जतला देणे शक्य होणार असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.