सिनेस्टाईल नव विवाहितेला पळवून नेहणारे सहा तरूण जेरबंद

जत,संकेत टाइम्स : उमदी येथून एका मुलीला अपहरण करून सहा तरूणांनी पळवून आणताना उमदी,जतच्या पोलीसांनी सिनेस्टाईल पाटलाग करून जेरबंद केले.
उमदी येथून या तरूणांनी एका मुलीला सिनेस्टाईल अपहरण करत पळवून नेहण्यात येत असल्याची माहिती उमदीचे पोलीस साहय्यक निरिक्षक दत्तात्रय कोळेकर यांना माहिती मिळताच त्यांनी त्या तरूणांचा पाठलाग सुरू केला.


निगडी खुर्द नजिक जत पोलीसांच्या मदतीने त्यांना जेरबंद केले.मात्र मुलगी व संशयित एक तरूण फरार झाले आहेत.पोलीसांनी पकडलेल्या सहा तरूणांकडून धारदार हत्यारे जप्त केल्याचे समजते.


जतचे सा.पो.निरिक्षक गोपाल भोसले,पो.ना.सचिन जंवजाळ,बंजरंग थोरात,शरद शिंदे,विकास गायकवाड,होमगार्ड डोईफोडे यांनी निगडीजवळ तरूणांच्या वाहनाला अडवून ताब्यात घेतले.दरम्यान उमदी पोलीसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.