कोरोनाबाधितांचा ग्राफही घटला,मुत्यू थांबेनात

जत,संकेत‌ टाइम्स : जत तालुक्यात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पन्नासवर जात 68 इतकी नोंद झाली आहे.तर आणखीन चार जणांचा मुत्यू झाला आहे. तर तब्बल 125 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
एकीकडे कोरोना बाधित रुग्ण कमी होत आहे. मात्र मुत्यू संख्या अद्याप कायम आहे. 


त्यामुळे चिंता कायम आहे.1074 रुग्ण सध्या उपचाराखाली आहेत.तालुक्यात सोमवार अखेर पर्यत 10078 रुग्णांची नोंद झाली आहे. जत 8,अचनहळ्ळी 1,वळसंग 4,रेवनाळ 1,शेड्याळ 1,खोजानवाडी 5,बिळूर 2,खलाटी 1,बेळोंडगी 1,गुळवंची 7,धावडवाडी 2,आंवढी 2,करेवाडी को.4,को.बोबलाद 1,तिकोंडी 1,जाळीहाळ बु.1,माडग्याळ 9,जा.बोबलाद 2,सनमडी 1,येळवी 2,पांढरेवाडी 4,मोटेवाडी 2,दरिकोणूर 1,आंसगी जत 2,सिध्दनाथ 2,पांडोझरी 1,खंडनाळ 1